

Ujani Dam Solar Project Update Only Nine Percent Area to Be Used for Solar Power Generation and 40000 Jobs Expected
sakal
पुणे: उजनी धरणातील नऊ टक्के क्षेत्रावर फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभारण्यात येणार असून, उर्वरित ९१ टक्के जलाशय खुले राहणार आहे. या प्रकल्पासाठी प्रतिवर्षी कमाल अर्धा टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. तसेच प्रकल्पातून दोन हजार ८०० कायमस्वरूपी आणि ४० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती अपेक्षित असल्याची माहिती सीना-माढा प्रकल्प उपविभाग क्रमांक एक आणि उजनी धरण व्यवस्थापन उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.