उजनी धरण गेले मायनसमध्ये...

उजनी धरण गेले मायनसमध्ये...

इंदापूर : पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदान ठरलेले उजनी धरण बुधवारी पहाटे 3 वाजता मायनसमध्ये गेले. गतवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे उजनी संपूर्ण क्षमतेने भरेल किंवा नाही याबाबत शंका होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात समाधानकारक पावस पडल्याने गतवर्षी उजनीचा पाणीसाठा १११% म्हणजे १२३ टीएमसी झाला होता. मात्र, 13 मे रोजी उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्त साठा संपून उजनीचा पाणीसाठा बुधवारी रात्री मृतसाठ्यात गेला आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

गतवर्षी २०१९ मध्ये उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यातच प्लसमधून मायनस मध्ये जाऊन पाणीपातळी वजा ५९ इतकी खालावली होती. दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी उजनीने मायनसच्या पाणी पातळीमधून उपयुक्त पाणी पातळीत आले होते तर परतीच्या पावसाने उजनी पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हाणजे मागील वर्षीपेक्षा दोन महिने उशीरा धरण वजा पातळीत गेले आहे. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत  समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचन व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नसला तरी पावसाळा चालू होईपर्यंत पाणी साठा निश्चित खालावणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उजनी धरणाच्या १२३ टीएमसी पाणीसाठ्या पैकी ५३.५७ टीएमसी पाणी उपयुक्त तर ६४.२८ टीएमसी हा मृतसाठा धरला जातो, तर ६ टीएमसी पाणी अतिरिक्त आहे.कारण उजनी धरण १००% भरते त्यावेळी ११७ टीएमसी पाणी असते आणि १११% पाणी साठवले जाते त्यावेळी पाणीसाठा १२३ टीएमसी होतो. चालू हंगामात उजनी धरणा तील ६३ टीएमसी पाणी संपले असून सध्या मुख्य कालव्यातून ३२०० क्युसेक तरदहिगाव उपसा सिंचन १०५ क्युसेक ने विसर्ग धरणा तून सुरू आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उजनी धरणाची मृत पाणीसाठवण क्षमता महाराष्ट्रातील मोठ्या धरणापैकी एक आहे. या धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने व दहा औद्योगिकवसाहतीचालतात.  सोलापूर शहरासह शेकडो गावातीलजवळपास ३० लाख नागरीकांची पिण्याच्या पाण्याची तर जवळपास तेवढ्याच शेतक-यांच्याशेतीची तहान याच धरणामधून भागविली जाते तसेच हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होते. यामुळे उजनी धरणाला राजकीय, आर्थिक, शेती, सहकार तसेच व सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे उजनी तील पाण्याचे काटेकोर नियोजन करावे अशी मागणी मुकुंद शहा, भास्कर गुरगुडे, वामन सरडे, मालोजी पाटील, हनुमंत जाधव, अमोलराजे इंगळे, सुभाष काळे या शेतकऱ्यांनी केले आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या उजनी धरणातील पाणीपातळी पुढीलप्रमाणे :

एकूण पाणीपातळी -  ४९०.९९० मीटर
एकूण क्षेत्रफळ - १९६.८१ चौ. कि.मी.
एकूण पाणीसाठा - १७९४. ९३ दलघमी
उपयुक्त  साठा -  उणे ०७.८८ दलघमी
एकुण पाणीसाठा -  ६३.३८ टीएमसी.
उपयुक्त साठा   - उणे ०.२८टीएमसी.
टक्केवारी      -    उणे ०.५२ टक्के
विसर्ग  कालवा - ३२०० क्युसेक
दहीगाव - १०५ क्युसेक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com