इंदापूर - रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर उजनी धरण शनिवारी (ता.९) संध्याकाळी १०० टक्के भरले. पाटबंधारे विभागाने सायंकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठा ११७.११ टीएमसीवर पोहोचला होता. यावेळी साठा ९९.७८ टक्के होता. त्यात रात्रीपर्यंत वाढ होत गेली व धरण भरले. धरण भरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.