इंदापूर - उजनी धरण क्षेत्रात मेमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २० जून पासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. यामध्ये २० जून ते ३ जुलै या कालावधीत उजनी धरणाच्या दरवाजातील विसर्गाबरोबरच विद्युत प्रकल्पासाठी देखील एक हजार ६०० क्यूसेकने विसर्ग सोडला जात होता. या कालावधीत तब्बल ३.७८३ दशलक्ष युनिट म्हणजे ३७ लाख ८३ हजार युनिट वीज तयार झाली आहे.