

सकाळ न्यूज नेटवर्क
श्रीनगर, ता.१६ ः ‘‘केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या तोंडी आश्वासनांवर विसंबून राहू नका. कोणतेही आश्वासन लेखी आणि स्वाक्षरीसह मिळाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा,’’ असा सल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज लडाख आणि कारगिलमधील नेत्यांना दिला.
पुलवामा येथे आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘मित्र आणि मोठा भाऊ या नात्याने मी लडाखमधील नेत्यांना एवढेच सांगेन की, केंद्र सरकारचे कोणतेही आश्वासन लेखी आणि स्वाक्षरीसह मिळत नाही, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवू नका. लडाखचे प्रश्न जम्मू-काश्मीरपेक्षा वेगळे आहेत, हे मान्य करताना अब्दुल्ला यांनी केंद्राच्या अधिकृत आश्वासनांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची लेखी नोंद असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. लडाख आणि कारगिलमधील नेत्यांनी केंद्राकडून कोणत्याही मागणीबाबत आश्वासन घेण्यापूर्वी ते लेखी स्वरूपात, शक्यतो प्रतिज्ञापत्राद्वारे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘आम्हीही आश्वासनाचे बळी’
जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याबाबत केंद्राकडून देण्यात आलेल्या आश्वासनाचा संदर्भ देत अब्दुल्ला म्हणाले की,आम्हीही अशा तोंडी आश्वासनाचे बळी ठरलो आहोत. निवडणुकीनंतर लगेच राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. आता जवळपास दोन वर्षे झाली; मात्र ते आश्वासन कुठेही पूर्ण होताना दिसत नाही,” असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.