आरोग्यासाठी ट्रेकिंगचे महत्व याबाबत उमेश झिरपे साधणार संवाद

गिर्यारोहण, ट्रेकिंग माध्यमातून मानसिक ताण - तणाव दूर करता येतो तसेच मानसिक ताण - तणावाच्या समायोजनासाठी गिर्यारोहण आणि ट्रेकिंग हे प्रभावी माध्यम आहे.
Umesh Jhirpe
Umesh JhirpeSakal

पुणे - गिर्यारोहण, ट्रेकिंग (Trekking) माध्यमातून मानसिक ताण - तणाव (Tension) दूर करता येतो तसेच मानसिक ताण - तणावाच्या समायोजनासाठी गिर्यारोहण आणि ट्रेकिंग (Trekking) हे प्रभावी माध्यम आहे, हे ओळखून शनिवारी (ता. ५) दुपारी बाराला प्रसिद्ध गिर्यारोहक व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे (Umesh Jhirpe) यांचा ‘मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि गिर्यारोहण’ या विषयी सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत झूम वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून उमेश झिरपे यांच्याशी गिर्यारोहण व ट्रेकिंग, आरोग्य, एकाग्रता आणि मानसिक स्वास्थ्य यांविषयी संवाद साधता येईल. (Umesh Jhirpe will Talk about Importance of Trekking for Health)

सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्यावतीने we are in this together या मोहिमेंतर्गत व कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअँबीलीटीजच्या सहकार्याने मानसिक ताण - तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही चोवीस तास हेल्पलाईन राज्यभर सुरु आहे. we are in this together या मोहिमेच्या अनुषंगाने आणि ‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाईनशी निगडित विविध क्षेत्रातील विविध वयोगटातील लोकांसाठी या वेबिनारचे आयोजन केले आहे.

Umesh Jhirpe
कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय; पुण्यात दिवसभरात ४५० नवे रुग्ण

डोंगरदऱ्यात रमणारा, पर्वत, शिखरे चढणारा गिर्यारोहक हा जेवढा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतो, तेवढाच मानसिकदृष्ट्या कणखर असतो. ध्यानधारणेच्या माध्यमातून मनाला कणखर व सकारात्मक ठेवत आणि योगसाधनेच्या माध्यमातून शरीराची व आरोग्याची काळजी घेत, गरज पडेल तेव्हा ‘ग्राऊंड वर्क’साठी नेहमी तयार असतो.

एव्हरेस्टसह जगातील आठ अष्टहजारी शिखर मोहिमांचे यशस्वी नेतृत्व करणारे भारतातील एकमेव गिर्यारोहक, शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित, आयुष्यातील चाळीसहून अधिक वर्षे गिर्यारोहणात कार्यरत असणारे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्याशी विविध बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत.

यावर मिळणार मार्गदर्शन

  • कणखर गिर्यारोहक कसे बनतात.

  • गिर्यारोहकांची जीवनशैली.

  • मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता यासाठी गिर्यारोहण व ट्रेकिंग कसे उपयुक्त आहे.

  • सर्व वयोगटांसाठी ट्रेकिंग व गिर्यारोहण उत्तम पर्याय.

  • गिर्यारोहण व ट्रेकिंगविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शिक्षक व पालक यांची भूमिका कशी असावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com