
नाटक आणि अन्य कार्यक्रम हे एकमेकांना भेटण्याचा, एकमेकांना भेटण्याचे औचित्य बनले आहे. त्यामुळेच नाटकाकडे आम्ही मरगळ झटकण्याचे साधन म्हणून पाहतो आहोत, असे मत अभिनेता उमेश कामत यांनी व्यक्त केले.
पुणे - ‘‘कोंडलेल्या स्थितीतून बाहेर पडल्यानंतर श्वास घेताना जो आनंद होतो, तसाच आनंद अनलॉकमुळे होतो आहे. आता मनोरंजन ही लोकांची पहिली गरज झाली आहे. नाटक आणि अन्य कार्यक्रम हे एकमेकांना भेटण्याचा, एकमेकांना भेटण्याचे औचित्य बनले आहे. त्यामुळेच नाटकाकडे आम्ही मरगळ झटकण्याचे साधन म्हणून पाहतो आहोत,’’ असे मत अभिनेता उमेश कामत यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले
उमेश कामत यांच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘सकाळ’ला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. कामत म्हणाले, ‘‘कोरोनामुळे संकटाला सामोरे जाण्याची सवय झाली. समाज पूर्वपदावर येऊ लागला असला, तरी आपल्याला शिस्त आणि स्वच्छतेचे नियम पाळावे लागतीलच. नाटक सुरू झाले, तरी मास्क आणि सरकारी नियम यांची सक्ती आहेच, त्याचा आदर करावा लागेल.’’
धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार
गेल्या आठ-नऊ महिन्यांत प्रत्येकामध्ये, परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. या काळात बरेचसे चिंतन झाले. त्यामुळे नाट्य सादरीकरणात काहीसा बदल होऊ शकेल. पण, मास्क लावून भूमिका करणे, संवादामध्ये कोरोनाचा संदर्भ आणणे, हे बदल आम्ही करणार नाही; कारण लोकांना आता कोरोनाचा विषय देखील नको वाटतो. त्यामुळे रसिकांचे निखळ मनोरंजन व्हावे, हाच आमचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले.
कामत म्हणाले, ‘‘नाटक पुन्हा कधी सुरू होईल, याची चिंता होतीच. अनलॉकमुळे सादरीकरणाला परवानगी मिळाली; परंतु प्रत्यक्ष एकत्र येऊन आम्ही तालमी करण्याचे टाळले. सुरुवातीला व्हिडिओ कॉल, गुगल मीटवरून प्रयत्न केला. आता नाट्यगृहात ‘झिरो शो’ करून आम्ही रंगमंचावर येत आहोत. मनोरंजन ही गरज झाली आहे. त्यामुळे रसिकांना मी आवाहन करीन की, नाटकाची मजा आपण घेऊच; पण सर्व खबरदारी घेऊयात.’’
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नाट्यगृहांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’मुळे एकाआड खुर्चीवर बसावे लागते. परंतु, एकाच घरातील लोक नाटकासाठी येत असतील, तर त्यांना शेजारी बसण्याची परवानगी आता दिली पाहिजे. तसेच हळूहळू ५० टक्के उपस्थितीची मर्यादा देखील काढली पाहिजे.
- उमेश कामत, अभिनेता
नाटकाचा उद्या प्रयोग
‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा प्रयोग रविवारी सायंकाळी सहा वाजता पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.