जातीपातीच्या बंधनात न अडकता त्यांनी केले 'असे'

sanitization1.jpg
sanitization1.jpg
Updated on
कॅन्टोन्मेंट (पुणे) : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पुण्यातील 'उम्मत' संस्थेने पुढाकार घेऊन सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे निर्जंतुक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत संस्थेचे कार्यकर्ते पदरमोड करून, धार्मिक स्थळाच्या संपूर्ण परिसरात फवारणी करत आहेत; तसेच संकटकाळातही सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सौहार्द कायम ठेवा, असे आवाहन करत आहेत.
 
 
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी लष्कर परिसरातील मानाच्या कामाठीपुरा सार्वजनिक गणपती मंदिर परिसरात निर्जतुकीकरण करून या मोहिमेस
प्रारंभ केला. त्यानंतर केदारी रस्त्यावरील हिंद तरुण मंडळाचे मंदिर, श्री शांतिनाथ भगवान जैन मंदिर, वानवडी बाजार व कोरेगाव पार्कमधील मशीद, हडपसर- रेसकोर्सजवळचा हॉलिवूड गुरुद्वारा, भीमपुऱ्यातील बौद्ध विहार परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी व साफसफाई करण्यात आली. हसन रंगरेज, बिलाल शेख, सलीम मौला पटेल, अतुल कांबळे, शेरू रंगरेज, मनोहर पिल्ले, अक्षय काकडे, रोहित भिसे, अब्दुल गणी शेख, सर्फराज खान, अमोल केदारी आदी अनेक कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या मोहिमेबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जावेद खान म्हणाले,  उम्मत या शब्दाचा अर्थ जातपात, धर्म, पंथ या भेदांच्या पलिकडे जाऊन सेवाकार्य करणाऱ्यांचा समुदाय आहे. हा अर्थ प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थेतर्फे वारकऱ्यांची सेवा, मोहरममध्ये सरबत वाटप, गणेशोत्सवात प्रसाद वाटप अशी अनेक सेवाभावी कामे करून एकोप्याचा संदेश दिला जातो. त्या अंतर्गतच आता संस्थेने सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे निर्जंतुक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. संस्थेचे कार्यकर्ते नोकरी-व्यवसाय सांभाळून, मास्क, हँडग्लोज घालण्याची खबरदारी घेऊन धार्मिक स्थळे सॅनिटाइज करण्याचे काम करत आहेत. कोरोनाचे निर्मूलन होईपर्यंत धार्मिक स्थळांची स्वच्छतेतून सेवा करण्याचे काम सुरूच ठेवणार आहोत.'
 
 
 
समाजातील सर्वधर्मसमभाव कायम राहावा आणि सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांची सेवा करावी, या उद्देशाने सर्व धार्मिक स्थळांचा परिसर निर्जतुक करण्याची मोहीम राबवली जात आहे.
 
- हसन रंगरेज, उम्मत संस्थेचे कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com