Pune News: स्वस्त घराचे स्वप्न ठरतेय महाग! पुण्यात अनधिकृत बांधकामांचा वाढता विळखा; स्वस्त घरांच्या आमिषाने नागरिकांची लाखोंची फसवणूक..

PMC action against unauthorized buildings: महापालिकेच्या संथ कारवाईमुळे उपनगरांत अनधिकृत इमारतींचा सुळसुळाट; स्वस्त घरांच्या आमिषाला भुललेल्या सर्वसामान्यांची आयुष्यभराची कमाई उद्ध्वस्त
Pune's Illegal Building Boom: Affordable Flat Offers Leave Homebuyers Cheated

Pune's Illegal Building Boom: Affordable Flat Offers Leave Homebuyers Cheated

esakal

Updated on

-ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेच्या संथ आणि निष्प्रभ कारवाईचा फायदा घेत शहराच्या उपनगरांमध्ये अनधिकृत इमारतींचे जाळे वेगाने विस्तारत आहे. बांधकाम व्यावसायिक नोटिसांना केराची टोपली दाखवत चार-पाच मजली इमारती उभारून स्वस्त घरांचे आमिष दाखवत सर्वसामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. महापालिका बुलडोझर घेऊन पोहोचेपर्यंत सदनिका विकल्या जातात आणि अखेरीस कारवाईचा फटका बसतो तो केवळ घरखरेदीदारांनाच. त्यामुळे बिल्डर मोकळे, प्रशासन निष्क्रिय आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई मात्र उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com