Jitendra Dudi
Sakal
पुणे
Jitendra Dudi : बँकांतील विनादावा ठेवींबाबत प्रसिद्धी करावी, जिल्हाधिकारी डुडी यांची सूचना; पुणे जिल्ह्यात ६५९ कोटी पडून
Pune Bank Alert : जिल्ह्यातील बँकांमध्ये गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून दावा न केलेल्या (अनक्लेम्ड डिपॉझिट) ६५९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, अशी माहिती बँकर्स जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत समोर आली.
पुणे : जिल्ह्यातील बँकांमध्ये गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून दावा न केलेल्या (अनक्लेम्ड डिपॉझिट) ६५९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, अशी माहिती बँकर्स जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत समोर आली. त्यावर सदर रकमेची मागणी संबंधितांनी करावी, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे जिल्हा अग्रणी बँकेने बँकनिहाय यादी द्यावी. तसेच त्याविषयी प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बँकांना दिल्या.