राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत 3200 लाभार्थ्यांना कृत्रीम अवयव

मिलिंदसंगई
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल.

बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल.

सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर हे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. खासदार सुप्रिया सुळे,  पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते या प्रसंगी उपस्थित असतील. 

ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत देण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु केली. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा मुळशी, खडकवासला, हवेली या मतदारसंघातील 3217 ज्येष्ठ नागरिकांना व्हिलचेअर, वॉकर, काठ्या, कुबड्या, चष्मे, श्रवणयंत्रे आदी साहित्याचे वाटप होणार आहे. हे साहित्य विनामूल्य त्यांना दिले जाणार असून या साहित्याची किंमत साडेतीन कोटी रुपये इतकी आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बारामतीत झालेल्या शिबीरात सात हजार रुग्णांची तपासणी झाली होती. या पैकी 3217 जणांना शुक्रवारी या साहित्याचे वाटप केले जाणार आहे. 

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या मतदारसंघातच आजवर हे वाटप झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी कमालीचा पाठपुरावा करुन ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारे हे साहित्य बारामती लोकसभा मतदारसंघात अक्षरशः खेचून आणले आहे. या पुढील काळातही या योजनेद्वारे अधिकाधिक गरजू लोकांना हे साहित्य देण्याचा  सुळे यांचा प्रयत्न असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under the National Violence Program, 3200 Beneficiaries of the Artificial Component