पेटीएम अपडेट करून देतो म्हणाला अन् दोघींना २ लाखांना चुना लावला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

संबंधित महिलेच्या मोबाईलवर केवायसी अपडेट करण्याचा मेसेज आला होता. ते अपडेट न केल्यास पेटीयम बंद होईल, असे सांगण्यात आले.

पुणे : सीमकार्ड आणि पेटीयम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ऑनलाईन पद्धतीने दोन महिलांची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

वानवडी पोलिस ठाण्यात ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार, त्या घरी असताना आयडीया कंपनीतून बोलत असल्याचे सांगत अमन वर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला होता. त्याने सीमकार्ड फोरजी करण्याच्या बहाण्याने त्यांना एक मेसेज पाठवून तो १२३४५ क्रमांकावर पाठवण्यास सांगितले. यानंतर त्याने सीमकार्ड आणि फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्याचा ऍक्‍सेस स्वत:कडे घेतला. यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एक लाख १९ हजार रुपये काढून घेतले.

रामायण लिहिलेल्या वाल्मिकींच्या नगरीत असा सुरू आहे आनंदोत्सव​

दुसऱ्या घटनेत एका ५३ वर्षाच्या शिक्षिकेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेच्या मोबाईलवर केवायसी अपडेट करण्याचा मेसेज आला होता. ते अपडेट न केल्यास पेटीयम बंद होईल, असे सांगण्यात आले. पेटीएम चालू ठेवण्यासाठी ऑनलाइन माहिती भरण्यास सांगितले. यानंतर फिर्यादीस पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून पैसे चार वेळा परत केले.

फिर्यादीला सर्व पैसे परत मिळतील असा विश्‍वास देऊन एक लाख ८० हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. मात्र त्यातील केवळ ९६ हजार ५०० रुपये परत करुन ८४ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक माया देवरे करत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under the pretext of updating Paytm a young man defrauded two women