Drug Menace Curbed: Crime Branch Seizes Mephedrone Worth ₹4 Lakh in Undri
sakal
पुणे : शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेने विशेष मोहीम उघडली असून, उंड्री परिसरातून १२.२ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) या अमली पदार्थासह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मेफेड्रोन आणि दुचाकी असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.