उंड्री-पिसोळी शिवेवरील रस्त्याला मुहूर्त कधी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road

उंड्री-पिसोळी शिवेवरील रस्त्याला मुहूर्त कधी मिळणार

उंड्री : उंड्री-पिसोळी शिवेवरील रस्त्याचे काम रखडल्याने स्कूलबसचालक आणि दुचाकीचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने या रस्त्याचे डांबरीकरण नाही, तर किमान खडीकरण तरी करावे, अशी आर्जवी मागणी स्कूल बसचालकांसह मनिषा होले, रेणुका भिंताडे, ललिता कामठे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

उंड्री परिसरामध्ये कोंढवा बु।।, येवलेवाडी, कात्रज परिसरातील स्कूल बससाठी हा रस्ता सोयीचा आहे. पालिका प्रशासनाकडे स्थानिकांनी नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, पालिका प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे या रस्त्याचे काम अद्याप रखडले आहे. आता या रस्त्याने चारचाकी नव्हे, दुचाकीही जाऊ शकत नाही, अशी अवस्था झाली आहे, अशी तक्रार माजी उपसरपंच स्नेहल दगडे यांनी केली आहे.

महामार्गावरील गर्दीतून स्कूलबस नेण्यापेक्षा या रस्त्याने बस नेणे सोयीचे आहे. पालिका प्रशासनाने या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे.

शंकर मिसेकर, स्कूल बसचालक

हिलग्रीन स्कूलशेजारून उंड्री-पिसोळी रस्ता आहे. या रस्त्यावरून परिसरातील मुलांना घेऊन स्कूलबस येतात. या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.

मोना डे, प्रिन्सिपल, हिलग्रीन

नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध नाही. पालिकेकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर या रस्त्याची कामे मार्गी लावली जातील.

-नरेश शिंगटे, कनिष्ठ अभियंता, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Undri Pisoli Shiva Road School Bus Drivers Cyclists Starts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..