पदवीधरांना शून्य टक्के व्याजदराने उद्योग-व्यावसायासाठी कर्ज द्या : कोकाटे

डी. के. वळसे-पाटील
Thursday, 19 November 2020

बेरोजगार पदवीधरांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज द्यावे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मला विधान परिषदेत काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी

मंचर : अरब राष्ट्रांमध्ये पदवीधरांना शून्य टक्के व्याजदराने उद्योग व्यावसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. फक्त एक टक्का प्रोसेसिंग शुल्क आकारले जाते. याप्रमाणेच राज्य शासनाने बेरोजगार पदवीधरांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज द्यावे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मला विधान परिषदेत काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी केले. मंचर (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. १९) झालेल्या आंबेगाव तालुक्यातील पदवीधरांच्या मेळाव्यात डॉ. कोकाटे बोलत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अध्यक्षस्थानी उद्योजक शरद पोखरकर होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे खेड तालुका समन्वयक वामन बाजारे, मंचर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन काजळे, जय किसान पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत बागल, डॉ. सुहास करणेजयेश शिंदे, साने गुरुजी कथा मालेचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे, सुनील वळसे पाटील, अविनाश ठाकूर, साहेबराव शिंदे, चांगदेव पडवळ,
संतोष थोरात उपस्थित होते. “सकाळ”ने प्रकाशित केलेले उपक्रमशील शिक्षक पुस्तक, वृक्ष, पगडी व शाल देऊन कोकाटे यांचा सन्मान करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोकाटे म्हणाले, ''कोरोना व लॉकडाउनमुळे अनेक पदवीधरांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले आहेत. त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरु राहतील. २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करावी. शाळा मान्यतेबरोबर १०० टक्के अनुदान द्यावे. अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना अध्यापनाचे काम द्यावे. शिक्षकदिन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या नावे सुरु करवा. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मराठी भाषा दिन सुरु करावा.'' 

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारे म्हणाले, ''शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा असलेल्या व पदवीधरांचे प्रश्न तळमळीने मांडणाऱ्या कोकाटे यांच्यासारख्या अभ्यासू व इतिहास प्रेमी तरुण उमेदवाराला विधानपरिषदेत पाठवा.'' यावेळी प्रा. अवधूत लोंढे, डॉ. सुहास कहडणे, पोखरकर यांची भाषणे झाली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unemployed graduates should be given loans for business says kokate