
पुणे : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश होण्यासाठी देशभरातील अनेक अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी आणि गडकोटप्रेमींनी प्रयत्न केले. यातीलच एक म्हणजे पुण्यातील युवा वास्तुविशारद तनय ललवाणी. युनेस्कोच्या सांस्कृतिक श्रेणीतील नामांकन करण्यात तनय यांनी मोलाचा वाटा उचलला.