
बुधवारी (२५ जून २०२५) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडला मोठी भेट दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे मेट्रोच्या लाईन-२ साठी ३,६२६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पुनर्वसनासाठी ५,९४० कोटी रुपयांच्या सुधारित झरिया मास्टर प्लॅनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.