केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी; संपूर्ण सहकार्याचे जावडेकरांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंड (अँटीबॉडीज) वाढली आहेत का, याबाबत केंद्र सरकारच्या मदतीने सिरो सर्वेक्षण करण्यात येईल.

पुणे : केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारला अकराशे कोटींचे सहाय्य केले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसोबतच व्हेंटिलेटर, पीपीई किट्‌स यासह आवश्‍यक वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, राज्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोनाला आळा घालण्यासाठी शरद पवार मैदानात; पुण्यात घेतल्या बैठकांवर बैठका!​

जावडेकर म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी बैठक पार पडली. या बैठकांमधून प्राप्त सूचना आणि मागण्यांनुसार आवश्‍यक उपाययोजना करण्यात येतील. प्रतिबंधित क्षेत्रात अँटिजेन टेस्ट वाढविण्यात येणार आहेत. जेणेकरून बाधित रुग्णांचा शोध घेऊन वेळेत उपचार करणे शक्‍य होईल. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंड (अँटीबॉडीज) वाढली आहेत का, याबाबत केंद्र सरकारच्या मदतीने सिरो सर्वेक्षण करण्यात येईल. 

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!​

मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्‍तीस एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत यंत्रणा व्यस्त असल्यामुळे अंमलबजावणी शक्‍य झाली नाही. परंतु यापुढील काळात याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. सर्व यंत्रणा कोरोनाशी लढण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करीत असल्याचे जावडेकर यांनी नमूद केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Prakash Javadekar said that Union Government will extend full cooperation to state