sakal suhana swasthyam event
sakal
पुणे - भगवंताचे नामस्मरण, भूतदया व परोपकार, इंद्रियनिग्रह, सत्संगाचे महत्त्व, समाधान व कृतज्ञता, निष्काम कर्मयोग अशी संतांनी दिलेली अनमोल शिकवण रसाळ निरूपणातून आणि सुरेल गाण्यांमधून उलगडली. कलाकारांच्या भावरसपूर्ण सादरीकरणातून जणू रसिकांनी संतसाहित्यातील ज्ञानामृताचा ‘अमृतानुभव’ घेतला.