esakal | ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे ‘अनोखी दिवाळी’ मोहीम |Pune
sakal

बोलून बातमी शोधा

png

‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे ‘अनोखी दिवाळी’ मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्सवकाळ सुरू होत असताना आघाडीचा ज्वेलरी ब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे ‘अनोखी दिवाळी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या सर्व स्टोअर्समध्ये सुरू असेल. दरवर्षी उत्सवकाळात १८८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे नावीन्यपूर्ण ग्राहककेंद्रित संकल्पना राबविल्या जातात. ‘अनोखी दिवाळी’ मोहीम हा त्यातीलच एक भाग आहे.

या मोहिमेमध्ये सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मिलाफाद्वारे एक नवीन आकर्षक कल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याअंतर्गत इअररिंग्स, नेकलेसेस, पेंडंटस, बँगल्स, रिंग्स यांचे आकर्षक डिझाईन सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या रूपात उपलब्ध असतील. ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत तर, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

या संदर्भात ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सर्वांवर झालेल्या विपरीत परिणामानंतर लोकांना आता सकारात्मकता हवी आहे. ‘अनोखी दिवाळी’ मोहीम ही त्या दृष्टिकोनातून ग्राहकांसाठी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न आहे. सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा मिलाफ हा पारंपरिक आणि समकालीन, आधुनिक शैली आणि जुन्या काळातील आकर्षकता याचे सुंदर मिश्रण आहे. हा प्रयत्न ग्राहकांच्या पसंतीस पडेल.’

loading image
go to top