पुण्यात पार पडला एक अनोखा विवाहसोहळा

अश्विनी जाधव केदारी
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुळात हा लग्नसोहळा सुरवातीपासूनच बेटी बचाओ बेटी पढाओ या थीम वर आधारित होता, लग्नाची पत्रिका, रुखवत, लग्नात मुलांनी घातलेले  टी शर्ट पाहुण्यांना देण्यात येणारे गिफ्ट्स सारं काही बेटी बचाओ बेटी पढाओ यावरच बेतलेले होते.

पुणे : लग्नसोहळ्यात चर्चा होते ती महागडे कपडे, दागदागिने, मानपान, जेवणाचा मेनू आणि अशा बऱ्याच गोष्टींची. पुण्यामध्ये मात्र एक असा लग्नसोहळा पार पडला ज्यामध्ये यापैकी कशाचीही चर्चा  झाली नाही, हा लग्नसोहळा चर्चेचा विषय ठरला तो केवळ लग्नात दिलेल्या अनोख्या सामाजिक संदेशामुळे. सामाजिक उपक्रमाची नाही तर चक्क एका अनोख्या लग्नसोहळ्याची. या लग्नसोङळ्या बेटी बचाओचा संदेश दिला गेला.

मुळात हा लग्नसोहळा सुरवातीपासूनच बेटी बचाओ बेटी पढाओ या थीम वर आधारित होता, लग्नाची पत्रिका, रुखवत, लग्नात मुलांनी घातलेले  टी शर्ट पाहुण्यांना देण्यात येणारे गिफ्ट्स सारं काही बेटी बचाओ बेटी पढाओ यावरच बेतलेले होते.

लग्नातील नवरदेव सागर पवार याची ही संकल्पना, ते स्वतः फार्मासिस्ट असल्याने स्त्रीभ्रूणहत्या हा शब्द कायम कानावर पडत असे, त्यामुळे याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे असं कायमच त्यांना वाटे त्यामुळे त्यांनी लग्नात लोकांचे प्रबोधन व्हावे यासाठी प्रयत्न केले. तसेच
लग्नसोहळा हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो, आपलं लग्न आणखी एका चांगल्या गोष्टीसाठी लोकांच्या लक्षात रहावं यासाठी नवरीमुलगी ही आग्रही होती, उपस्थितांनाही या सोहळ्याचे अप्रूप वाटले, बेटी बचाओ सारख्या सामाजिक विषयाची जनजागृती होण्यासाठी लग्नसोहळा हे माध्यम निवडल्याने जमलेल्या मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला.

Web Title: unique marriage in pune gives save girl child message