शालेय मुलांसाठी प्रयोगातून विज्ञान शिकण्याचा अनोखा उपक्रम

संडे सायन्स स्कूल व सकाळ माध्यम समूहाच्यावतीने पुण्यात गेल्या दहा वर्षांपासून शालेय मुलांसाठी प्रयोगातून विज्ञान शिकण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.
Sunday Science School
Sunday Science SchoolSakal

पुणे - संडे सायन्स स्कूल (Sunday Science School) व सकाळ माध्यम समूहाच्यावतीने (Sakal Media Group) पुण्यात गेल्या दहा वर्षांपासून शालेय मुलांसाठी (School Child) प्रयोगातून (Experiment) विज्ञान शिकण्याचा (Education) अनोखा उपक्रम राबविला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांचे प्रयोग करण्याचे कौशल्य, निरीक्षण क्षमता व वैज्ञानिक दृष्टिकोन, वाढीस लागावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वर्षातील जवळपास सहा महिने रविवारी चालणारा हा उपक्रम मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याने त्यांच्या वैज्ञानिक संकल्पना अधिक स्पष्ट होतात. (Unique Science Learning Activity for School Children)

इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २२ ते २५ आठवडे, तर पहिली व दुसरीच्या मुलांसाठी १५ आठवड्यांचा असलेला हा उपक्रम येत्या ४ जुलैपासून सुरु होणार आहे. यामध्ये वयाप्रमाणे वेगवेगळ्या लेव्हल्ससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीनुसार आता प्रयोगाचे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना कुरिअरने घरपोच मिळेल. दर रविवारी पाठवलेल्या व्हिडिओच्या मदतीने विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित असणारे प्रयोग किंवा सायन्स मॉडेल्स विद्यार्थी स्वत: हाताने बनतील व ऑनलाइन मीटिंगच्या मदतीने विषय समजावून घेतील. व्हिडिओ व ऑनलाइन मीटिंग इंग्रजी भाषेतून असतील.

Sunday Science School
Corona: पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून राहणार बंद

कोरोना काळात शाळेतील अभ्यासाला मदत व्हावी म्हणून सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाच्या संपूर्ण विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित ॲनिमेशनचा वापर असलेले इंग्रजी भाषेतील ई-पाठ्यपुस्तक देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा उपक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.घरपोच मिळणारे प्रयोगाचे सर्व साहित्य, नोट्स, त्यावरील व्हिडिओ, ऑनलाइन मीटिंग, ई-पाठ्यपुस्तक असे सर्व काही या उपक्रमात असून देखील या कोर्सेसची फी अतिशय माफक आहे. दोन हप्त्यांमध्ये फी भरण्याची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमासाठी येत्या ३० जूनपर्यंत नाव नोंदवता येणार आहे.

प्रयोगातून विज्ञान शिक्षण उपक्रम

प्रयोग साहित्य घरपोच मिळणार

दर्जेदार डिजिटल साहित्य व व्हिडिओ

दर रविवारी लाइव्ह क्लास

शुल्क : विविध लेव्हल्स साठी रु. ३१०० ते रु. ६९०० (सर्वसमावेशक)

(येत्या २३ तारखेपर्यंत नाव नोंदवल्यास फीवर रु. ४०० सूट मिळेल.)

या ठिकाणी संपर्क साधा

अधिक माहितीसाठी ९६०७२०८५५२ / ९३७३०३५३६९ / ८७७९६७८७०९ या क्रमांकावर संपर्क करावा. सविस्तर माहिती मिळविण्यासाठी वरील कुठल्याही क्रमांकावर विद्यार्थ्यांचे नाव व इयत्ता लिहून व्हॉट्सअफप मेसेज पाठवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com