Pune : युनिव्हर्सल पासमुळे पीएमपी प्रवाशांचा होतोय गोंधळ

प्रशासनने तोडगा काढावा कष्टकऱ-कामगार-वाहकांमध्ये तूतू मैमै
Universal Pass causes confusion for PMP passengers
Universal Pass causes confusion for PMP passengerssakal

उंड्री : कोरोनाचा(Corona)वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाने आता पीएमपी(PMP Pune) प्रवाशांना युनिव्हर्सल पास सक्तीचा केला आहे. मात्र, त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये तूतू मैमै होत आहे. कष्टकरी-कामगारांना युनिव्हर्सल पासविषयी माहिती नाही, त्यामुळे त्यांना समजावून सांगताना गोंधळ उडत आहे. वाहक आणि प्रवाशांच्या अडचणीवर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी उंड्रीतील मजूर ज्ञानेश्वर कांबळे यांनी केली आहे.हडपसर(Hadapsar) आगारातून लगतच्या गावामध्ये पीएमपी बससेवा सुरू आहे.

Universal Pass causes confusion for PMP passengers
पुण्यात कोरोनाचा वाढता धोका; PMPML प्रवाशांसाठी सोमवारपासून नवे नियम

उपनगरालगतच्या गावातील कामगार-कष्टकरी प्रवासी मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात. मात्र, कोरोना लसीकरण केल्याचा युनिव्हर्सल पास म्हणजेच त्यांना काही माहिती नाही. युनिव्हर्सल पास म्हणजे काय हे प्रवाशांना समजावून सांगेपर्यंत बसथांबा येतो. बहुतेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी त्याविषयीचे कागद जवळ बाळगले नसल्याने त्यांची फसगत होत आहे. अनेकजण मोबाईलवर दाखवत आहेत. मात्र, अनेकांकडे अॅन्ड्रॉइड मोबाईलसारख्या सुविधा नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. पीएमपीच्या मुख्य थांब्यावर या बाबी तपासणे शक्य आहे. मात्र, इतर थांब्यावर प्रवासी गर्दी करून बसमध्ये प्रवास करतात, जवळच्याच थांब्यावर प्रवाशांना उतरायचे असते, त्यामुळे त्या सर्वांचा युनिव्हर्सल पास तपासणे जिकीरीचे झाले आहे. प्रवाशांनाही त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे वाहकांनी सांगितले.

Universal Pass causes confusion for PMP passengers
अपहरण झालेल्या मुलाला घरापर्यंत पोचवणारी व्यक्ती कोण? वाचा कसा सापडला 'डुग्गू '?

भेकराईनगर पीएमपी आगारातील महादेव पोमण, प्रमोद जेधे, सुशील यादव, कालिदास नाळे, राधाकिसन कोऱ्हाळे, समाधान आहिरे, सुनील बालगुडे यांनी प्रवाशांना युनिव्हर्सल पासविषयी माहिती दिली. तसेच, प्रवासांना सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर प्रवास करणे तुमच्या हिताचे आहे असे समजावून सांगितले.दरम्यान, हडपसर आगारप्रमुख सुहास गायकवाड म्हणाले की, स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी लस घेतल्याचे सांगून पीएमपी बसमध्ये प्रवास केला पाहिजे. वाहक आणि प्रवाशांनी दोघांनीही समजून घेतले, तर अडचणी येणार नाहीत. त्यासाठी प्रवाशांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com