विद्यापीठ अल्युमिनाय आणि व्हिएम इंटलेकमध्ये सामंजस्य | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले विद्यापीठ

पुणे : विद्यापीठ अल्युमिनाय आणि व्हिएम इंटलेकमध्ये सामंजस्य

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू अल्युमिनी असोसिएशन व व्हिएम इंटेलॅक्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांवर असलेल्या विद्यार्थ्यांशी एकमेकांना जोडणे, त्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबविणे, नवकल्पना, ज्ञान आदींची देवाणघेवाण या माध्यमातून करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं व प्राध्यापकांचं एक नेटवर्क तयार करणे शक्य होईल.

करारप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, ऍड एस.के. जैन, डॉ. परवीन सय्यद, प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, प्रा. डॉ. संजय ढोले, व्हिएम इंटेलॅक्टचे संचालक विक्रमसिंह देसाई आदी उपस्थित होते. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणत अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी विद्यापीठाच्या एसपीपीयू अल्युमिनी असोसिएशनकडून प्रयत्न केले जात आहेत.

एसपीपीयू अल्युमिनी असोसिएशन या सेक्शन ८ कंपनीच्या माध्यमातून विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

'विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आज जगाच्या पाठीवर सर्वत्र आहेत. त्यांच्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून अल्युमिनी असोसिएशन काम करत आहे. यातून विचारांची देवाणघेवाण करण्याबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.'

- प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image
go to top