विद्यापीठाचे क्रेडिट कोर्स ‘स्वयं’ पोर्टलवर

ब्रिजमोहन पाटील
रविवार, 28 जून 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) विकसित केलेले सहा क्रेडिट कोर्स केंद्र सरकारच्या ‘स्वयं’ पोर्टलवर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे राज्यशास्त्र व व्यवस्थापन विषयातील क्रेडिट कोर्स करणे देशातील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्‍य होणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) विकसित केलेले सहा क्रेडिट कोर्स केंद्र सरकारच्या ‘स्वयं’ पोर्टलवर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे राज्यशास्त्र व व्यवस्थापन विषयातील क्रेडिट कोर्स करणे देशातील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्‍य होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कोरोना’मुळे ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठाने ‘ई-कंटेंट’ तयार करणे, विद्यार्थ्यांना हे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी काम हाती घेतले आहे. तसेच, ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, मागील वर्षापासून विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठी चॉइस बेस क्रेडिट सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या वर्षी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम या पद्धतीने शिकविल्यानंतर यंदा द्वितीय वर्षही त्याच्या कक्षेत आले आहे. या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘स्वयं’च्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षणातून क्रेडिट कोर्स करता येणार आहेत.

पुणे विद्यापीठाच्या सहा क्रेडिट कोर्सला ‘स्वयं’च्या विद्या परिषदेने मान्यता दिली आहे, अशी माहिती ‘ईएमआरसी’चे समन्वयक श्रीकांत ठकार यांनी दिली.

‘स्वयं’च्या माध्यमातून २० टक्के क्रेडिट ट्रान्स्फर शक्‍य होते. मात्र, आता ते ४० टक्‍क्‍यांवर नेले जाणार आहे. देशातील नामांकित प्राध्यापकांनी तयार केलेले अभ्यासक्रम ‘स्वयं’वर सर्व विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क उपलब्ध असतात. पुणे विद्यापीठानेही सहा अभ्यासक्रम तयार केले आहेत.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

क्रेडिट कोर्समधील बहुतांश विषय व्यवस्थापन शाखेशी संबंधित असले, तरी कोणत्याही पदवीचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. ८ ते १२ आठवड्यांचे हे अभ्यासक्रम आहेत. यास प्रत्येकास ३ ते ४ क्रेडिट मिळणार आहेत. तसेच, प्रत्येक आठवड्याला अंतर्गत मूल्यांकनासाठी परीक्षा असते. अंतिम परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ‘स्वयं’कडून घेतली जाते.
- विवेक नाबर, निर्माता, ईएमआरसी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University credit course on swayam portal