

Crop Losses Mount in Baramati, Dy CM Sunetra Pawar Assures Support
esakal
-कल्याण पाचांगणे
माळेगाव : बारामती तालुक्यातील पणदरे, धुमाळवाडी, पवईमाळ परिसरावर अवकाळी पाऊस आणि भीषण गारपीटीने अक्षरशः कहर केला असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उभ्या पिकांची राखरांगोळी करत या नैसर्गिक संकटाने अनेक कुटुंबांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फेरले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाधित शिवाराला भेट देत शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. पणदरे परिसरातील बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नुकसानाच्या तुलनेत शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.