Pune : अवकाळी पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture

पुणे : अवकाळी पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान

उंड्री - अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत हजेरी लावली. या पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू पिकांना जीवदान मिळाले. या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे विहिरींनी तळ गाठला असून, पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न पडला होता, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

होळकरवाडीतील (ता. हवेली) शेतकरी ज्ञानोबा शेंडकर, लक्ष्मण झांबरे, अनंता झांबरे, भैरू झांबरे, पांडुरंग होळकर, नाना झांबरे, धोंडिबा झांबरे म्हणाले की, मागिल वर्षी पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे पाणी समस्या जाणवली नाही. मात्र, यावर्षी जून महिन्यापासून सप्टेंबरअखेरपर्यंत पाऊस तुलनेने कमी झाल्याने ओढे आटले असून, विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी समस्या गंभीर बनत आहे.

शेतामध्ये आणि सखल भागात पाणी साचले होते. पाणी साचल्यामुळे चिखलमय रस्त्यातून वाहनचालकांना कसरत करावी लागली.

loading image
go to top