

Journey of Sanket Pokharkar from Farmer’s Son to Sub Lieutenant
Sakal
पारगाव : खडकवाडी ता. आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संकेत मंगल दत्तात्रेय पोखरकर या तरुणाने १८ व्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या युपीएससी (एनडीए) परीक्षेत उतुंग यश संपादित करून देशपातळीवरील (एआयआर -१२९ रॅंक) प्राप्त केली होती. इझीमाला (केरळ) येथील इंडियन नेव्हल अॅकॅडमी मध्ये सब लेफ्टनंट(वर्ग -१ ) अधिकारी पदाच्या चार वर्षाच्या खडतर प्रशिक्षणा नंतर आज शनिवारी भारतीय संरक्षण दलाचे (सीडीएस) जनरल अनिल कुमार चौहान यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या पासिंग आऊट परेडच्या दिक्षांत समारंभात संकेत पोखरकर ने सब लेफ्टनंट पदवी संपादन केली आहे.