Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

हवामान बदलामुळे गेल्या काही दशकांमध्ये उष्णतेच्या लाटा (हीट वेव्ह) देशातील सर्वांत जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक बनल्या आहेत.
Heat Wave

Heat Wave

sakal

Updated on

पुणे - हवामान बदलामुळे गेल्या काही दशकांमध्ये उष्णतेच्या लाटा (हीट वेव्ह) देशातील सर्वांत जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक बनल्या आहेत. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) नव्या अभ्यासानुसार, भारतातील शहरी भागांमध्ये उष्णतेचा सामना करण्याच्या प्रमाणात (अर्बन हीट एक्स्पोजर) तब्बल १५७ टक्क्यांनी धक्कादायक वाढ झाली आहे. यातील सुमारे ६४ टक्के वाढ ही लोकसंख्या वाढीमुळे, तर ३६ टक्के वाढ शहरी तापमानवाढीमुळे झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com