
पुणे : आर्थिक सुबत्ता आणि सहज उपलब्ध होणाऱ्या बाबींमुळे ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात दररोज प्रतिव्यक्ती सरासरी कॅलरी (उष्मांक), प्रोटीन (प्रथिने) व फॅट (तेलकट पदार्थ) पदार्थांच्या सेवनात सौम्य वाढ झाली आहे. शरीराचे वजन वाढवणाऱ्या व हृदयाला हानिकारक ठरणाऱ्या ‘फॅट’चे सेवन शहरी भागात ग्रामीणच्या तुलनेत वाढले आहे. सरकारने केलेल्या अहवालातही काही महत्त्वाची निरीक्षणे समोर आली आहेत.