
पुणे : ‘‘मिळकतकरावर दंड व व्याज लावला जात असल्याने कराची रक्कम दुप्पट-तिप्पट वाढते, त्यातून थकबाकी वाढलेली दिसते. परिणामी नागरिक कर भरू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देता येईल, यादृष्टीने महापालिकेने प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठवून द्यावा. मिळकतकर बिलावर आकारलेला दंड व व्याज कमी केल्यास कर आकारणी वाढेल,’’ अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी दिली. समाविष्ट गावांमधील रहिवाशांवरही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने कररचना करावी, अशीही सूचना महापालिकेला केल्याचे त्यांनी सांगितले.