उर्दू भाषेचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

उर्दू वाचन, लेखन, श्रवण आणि उर्दू संभाषण ही चार कौशल्ये अभ्यासक्रमात शिकविली जाणार आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार याची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. एका बॅचमध्ये ३० विद्यार्थी असणार आहेत. हा अभ्यासक्रम हिंदी विभागाअंतर्गत चालवला जाईल, असे विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) उर्दू भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम एका वर्षाचा असणार असून, यासाठी दहावीपेक्षा जास्त शिक्षण झालेले असणे अनिवार्य आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उर्दू वाचन, लेखन, श्रवण आणि उर्दू संभाषण ही चार कौशल्ये अभ्यासक्रमात शिकविली जाणार आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार याची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. एका बॅचमध्ये ३० विद्यार्थी असणार आहेत. हा अभ्यासक्रम हिंदी विभागाअंतर्गत चालवला जाईल, असे विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले.

पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच 

पुणे विद्यापीठाकडून उर्दू भाषा शिकवली जावी, त्यासाठी अभ्यासक्रम असावा यासाठी ॲड. सलीम शेख यांनी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडे पाठपुरावा केले होता. त्यानुसार कुलगुरूंनी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.  या समितीत डॉ. अझमत दलाल, प्रा. अब्दुल बारी, श्रीमती उझ्मा तसनीम तसेच, निमंत्रित म्हणून अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांचा समावेश होता. या समितीने अभ्यासक्रमाची रचना ठरवली. त्यानुसार आता अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा कोर्स सुरू करण्याचा पाठपुरावा करण्यामध्ये अब्दुल करीम अत्तार, सय्यद रियाझुद्दीन, इम्तियाझ शेख यांचाही सहभाग होता, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Urdu language course will start at the pune university