

Reckless Behavior on Moshi Roads Ignored by Police
sakal
मोशी : पुणे-नाशिक महामार्गावर चाकणकडून येताना टोलनाक्यापुढील सिग्नल, देहू-आळंदी बीआरटी रस्ता, भारतमाता चौक सिग्नल, जुना आळंदी चौक सिग्नल, श्री नागेश्वर महाराज उपबाजार चौक सिग्नल व राजा शिवछत्रपती चौक सिग्नल येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, रुग्णवाहिका चालकांसह रुग्ण व नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी ही केवळ पोलिसांची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिक, वाहनचालक आणि पोलिस यांनी मिळून शिस्त पाळल्यासच हा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा दररोजचा प्रवास म्हणजे त्रास, वेळेची नासाडी आणि अपघातांना आमंत्रण ठरणार आहे.