

Uruli Kanchan police seize over ₹11 lakh worth of illegal liquor
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता.०४) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली.या दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार रमेश भोसले गस्त घालीत असताना त्यांना एका खबऱ्याने माहिती दिली की,उरुळी कांचन हद्दीत गावठी हातभट्टी दारूची वाहतुक करीत असलेल्या एका पिकअपचा टायर फुटला आहे.