
उरुळी कांचन: मारहाण आणि सतत सुरु असणाऱ्या वादाला कंटाळून एका व्यक्तीने साडीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना १८ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जेधे चाळ इनामदारवस्ती परिसरात घडली होती. मात्र, आत्महत्या केलेल्या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे कारण सांगितले असल्याचा पुरावा कुटुंबियांच्या हाती लागला अन् आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला.