Uruli Kanchan Accident : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचनमध्ये अपघातांची मालिका सुरूच; फ्लेक्सच्या अतिक्रमणामुळे अंतर्गत रस्त्यावरील वाहने दिसत नसल्याने कारवाईची मागणी

Fatal Road Accident in Uruli Kanchan | Illegal Advertising Hoardings Raise Safety Concerns : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचनच्या इरिगेशन कॉलनी चौकात डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी झाला. अनधिकृत जाहिरात फ्लेक्समुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Fatal Road Accident in Uruli Kanchan | Illegal Advertising Hoardings Raise Safety Concerns

Fatal Road Accident in Uruli Kanchan | Illegal Advertising Hoardings Raise Safety Concerns

esakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनी चौकात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला,तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.डंपरच्या चाकाखाली महिला चिरडली गेल्याने घटनास्थळी मृत्यूचा थरार उडाला.शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.गीता सुदामा वर्मा (सध्या रा.उरुळी कांचन मूळ उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या माहितीचे नाव आहे,तर तिचा पती सुदामा वर्मा हा गंभीररित्या जखमी झाला आहे.

Loading content, please wait...