

Nearly 990 Children Deprived of Aadhaar Due to Pending Birth Records
Sakal
सुनील जगताप
उरळी कांचन : उरुळी कांचन येथील ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे सुमारे ९९० बालके आधार कार्ड पासून वंचित...उरुळी कांचन ग्रामपंचायत परिसरातील २०२४ साली वेगवेगळ्या खाजगी,सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच घरी जन्म घेतलेल्या बालकांच्या जन्माची नोंद ग्रामपंचायतच्या तत्कालीन कर्मचाऱ्याकडून प्रलंबित ठेवण्याने व आता त्या पोर्टलवरून नोंद करून देता येत नसल्याने ही बालके जन्म दाखल्यापासून वंचित आहेत.महत्वाचे म्हणजे शासनाच्या नवीन निर्णयानुसार आधार कार्ड नोंदणीसाठी क्यू आर कोड असलेला जन्म दाखलाच ग्राह्य धरावा या आदेशाने या बालकांच्या आधारची नोंदणी होऊ शकत नाही.आणि सर्व शासकीय कामकाजात वा खाजगी ठिकाणी आधार आवश्यक असल्याने या मुलांचा आधारच खुंटला आहे.