Grampanchayat Election: ग्रामपंचायत मतदारांना एनसीएमसी स्मार्ट कार्डाची भुरळ ! तर महिलांना उज्जैनच्या महाकालेश्वराच्या दर्शनाची सफर !

ग्रामपंचायत निवडणुका अनिश्चित; सरपंचपदाचे इच्छुक एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिरांतून मतदारांची माहिती व विश्वास दोन्ही गोळा करण्यात गुंतले
uruli kanchan gram panchayat election ncmc smart card camp women voters mahakaleshwar darshan sarpanch candidates pune rural

uruli kanchan gram panchayat election ncmc smart card camp women voters mahakaleshwar darshan sarpanch candidates pune rural

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पूर्ण गावातून मतदान होऊन सरपंच निवडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या गावातील इच्छुक उमेदवार जेष्ठ नागरिकांच्या,महिलांच्या व मुलींच्या सुविधा पुरवण्याकडे देऊ लागले जास्त लक्ष ! उरुळी कांचन व परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे उमेदवार सध्या वार्डा वार्डात एसटी बस प्रवासासाठी लागणाऱ्या सवलतीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डासाठीची शिबिरे घेऊ लागले आहेत.या शिबिराच्या माध्यमातून या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडे मतदाराचा आधार क्रमांक, फोन नंबर, मतदाराचा पत्ता, कुटुंबातील सदस्यांची संख्या आदी बाबींची अद्ययावत माहिती कमी त्रासात गोळा होण्यामुळे अशी शिबिरे भरवण्याकडे इच्छुकांचा वाढता कल दिसून येत आहे. तसेच महिला, मुली व ज्येष्ठांना गाव सोडून ज्या ठिकाणी एसटीचा डेपो आहे त्या ठिकाणी जाऊन हे कार्ड काढण्याचा त्रास करून घेण्याऐवजी अशा शिबिरांच्या माध्यमातून ती सोय उपलब्ध होत असल्याने त्यांचाही या शिबिरांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

फोटो ओळ :- एनसीएमसी स्मार्ट कार्डासाठी आयोजित शिबिरात उडालेली महिलांची झुंबड.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com