Demand for 50% House Tax Relief in Uruli Kanchan
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन गावाच्या हद्दीतील निवासी मालमत्ता धारकांना शासन निर्णयाप्रमाणे "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत" निवासी मालमत्तेच्या घरपट्टीत व अन्य करांच्या थकबाकीत ५० टक्के सवलत देण्याची मागणी असंख्य नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडे केली आहे.शासन निर्णय क्रमांक व्हीपीएम-२०२५/प्र.क्र.६२ पंरा -१ दि.१३/११/२०२५ नुसार राज्यातील ग्रामपंचायतच्या थकीत घरपट्टी व अन्य इतरांवर ५०% माफी देऊन त्याची वसुली वा भरणा करण्यासाठी ३१ डिसेंबर ही मुदत ग्रामपंचायतीना दिली आहे.