

Garbage bins overflowing near the entrance of Padmashri Dr. Manibhai Desai Arts and Commerce College in Uruli Kanchan have triggered concerns over hygiene and student safety, with residents questioning the Gram Panchayat's waste management.
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या शैक्षणिक संकुलातील पद्मश्री मणिभाई देसाई कला व वाणिज्य महाविद्यालय,डाळिंब गावातून येणाऱ्या ओढयाच्या लगत असलेल्या रस्त्याच्या बाजूस आहे.हे ठिकाण गावाच्या मध्यवर्ती असे असून परिसरातील असंख्य युवा विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाने आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार करण्यास मदत करणारे शैक्षणिक संकुल आहे.या ठिकाणाहून युवक आपल्या आयुष्यातील पुढील उपक्रमशील व संस्कारक्षम जीवनाची सुरुवात करण्यास सरसावत असतो,मात्र या कॉलेजमध्ये शिक्षण व आदर्श संस्कार घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत ग्रामपंचायतीच्या कचराकुंड्यानी होते ही बाब निश्चितच गंभीर आहे.