

Sarpanch Election Results in Uruli Kanchan
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : पूर्व हवेली तालुक्यात सर्वात मोठ्या व व्यापारीदृष्ट्रया संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या पाच वर्षातील सातवा सरपंच म्हणून मिलिंद तुळशिराम जगताप यांची निवड झाली आहे.सतरा सदस्य असलेल्या उरुळी कांचन ग्रांमपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत १७ पैकी ९ मते मिळवून मिलिंद तुळशिराम जगताप हे सरपंच पदी विराजमान झाले आहेत.ग्रामपंचायतीच्या डॉ.मणिभाई देसाई सभागृहात आज (शुक्रवार) सरपंच पदाची निवडणुक पार पडली.