

Uruli Kanchan petrol pump manager embezzlement 2.63 crore case
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : पेट्रोल पंपावर तब्बल १६ वर्षे व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या विश्वासू कर्मचाऱ्याने तब्बल २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.याप्रकरणी पंपाचे भागीदार अक्षय बाळकृष्ण काळे (वय ३६,रा.मगरपट्टा सिटी,हडपसर)यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नितीन रामचंद्र रायपुरे (वय ५२,रा.घोरपडे वस्ती,शांती किरण सोसायटी,कदमवाकवस्ती,ता.हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.