Pune Illegal Road Block: ९ कोटींच्या डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए निष्क्रिय

९ कोटींच्या रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए व ग्रामपंचायतींच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
₹9-crore road blocked by debris; rider seriously injured.

₹9-crore road blocked by debris; rider seriously injured.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : सुमारे ९ कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या डांबरी रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीरपणे माती अन् दगडांचे ढिगारे टाकून रस्ता बंद केल्याची धक्कादायक बाब एका दुचाकीच्या अपघाताने समोर आली आहे.गुरुवारी (ता.२८) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंधारात हा बेकायदेशीर ढिगारा न दिसल्याने एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला.ढिगाऱ्याला धडकून दुचाकीस्वार तब्बल १० ते १५ फूट हवेत उडून खाली फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला.आप्पा विजय पौळ(रा.झोंबाडे वस्ती,उरुळी कांचन,ता.हवेली,जि.पुणे) असे या अपघातात गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचे नाव असून,त्याच्यावर गेल्या ६ दिवसांपासून उपचार सुरू आहेत खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com