Uruli Kanchan Girl Murder Case Solved, One Suspect Arrested After Intensive Investigation
Sakal
उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात घडलेल्या २० वर्षीय युवतीच्या खुनाचा थरारक गुन्हा केवळ काही दिवसांत उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत आरोपी दिनेश संजय पाटोळे (वय २६, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.