Sant Tukaram Palakhi: उरुळी कांचनमध्ये संत तुकाराम महाराज पालखी विसाव्यासाठी ८०x२०० फुटांचा भव्य जलावरोधक मंडप

उरुळी कांचनमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या विसाव्यासाठी ८० फूट रुंद, २०० फूट लांब जलावरोधक भव्य मंडप उभारणी; वारकऱ्यांसाठी मुरमीकरण, पाणी न साचण्यासाठी विशेष नियोजन
The Palkhi procession will halt at Uruli Kanchan on July 12 with arrangements for drinking water, sanitation and healthcare.

The Palkhi procession will halt at Uruli Kanchan on July 12 with arrangements for drinking water, sanitation and healthcare.

Sakal

Updated on

सुनील जगताप,

उरुळी कांचन : जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणी काळभोर (कदमवाक वस्ती) येथील पालखी तळावरील एकादशीचा मुक्काम आटोपून,रविवार दिनांक १२ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास उरुळी कांचन येथे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या मालकीच्या भव्य जागेत विसाव्यासाठी थांबणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पावसाचे दिवस गृहीत धरुन या ठिकाणी आगळ्यावेगळ्या अन ८० फुट रुंद आणि २०० फुट लांब सुमारे २० फुट उंच अशा भव्य मंडपाच्या उभारणीचे काम सुरू आहे.तसेच पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना व पंचक्रोशीतील भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंडपाभोवतीच्या परिसरामध्ये मुरमीकरण करून कोठेही पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com