

Quality Concerns Over Non-Dissolving Fertilizers
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : पूर्व हवेलीत विशेषता उरुळी कांचन परिसरातील खत विक्रेते युरिया खताची पिशवी मागितली की,अन्य खतांच्या पिशव्या घेण्याची बळजबरी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत.युरिया खताच्या पिशव्या गोडाऊनमध्ये शिल्लक असतानाही,शेतकऱ्यांनी युरिया खताची पिशवी मागितल्यानंतर तो खत विक्रेता सुरुवातीला युरिया शिल्लक नाही असेच उत्तर देतो.मात्र नंतर शेतकऱ्याला आपण २०:२०:०० घ्या मग एरिया देतो किंवा १५:१५:१५ घ्या मग युरिया देतो,किंवा १५:१५ खताची पिशवी घेतली तर लिक्विड युरिया देतो अशा पद्धतीची बतावणी करुन शेतकऱ्यांची आज मितिला उरुळी कांचन परिसरामध्ये पिळवणूक सुरू आहे.