Uruli Kanchan News : उरुळी कांचन पशुवैद्यकीय चिकित्सालयाला दर्जा तालुका स्थराचा; मात्र कर्मचारी फक्त दोन!

Veterinary Hospital : तालुका स्तराचा दर्जा असूनही उरुळी कांचन पशुवैद्यकीय चिकित्सालय केवळ दोन कर्मचाऱ्यांवर चालते. फिरत्या दवाखान्यावर वाढता भार, हजारो पशुधनाची जबाबदारी.
Uruli Kanchan taluka-level veterinary hospital operating with only two staff members

Uruli Kanchan taluka-level veterinary hospital operating with only two staff members

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : उरुळी कांचन या हवेली तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाला तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय म्हणून दर्जा आहे पण या ठिकाणी मंजूर तीन पदांपैकी फक्त दोनच कर्मचारी नियुक्तीला असल्याने कामकाजाला मर्यादा आलेल्या आहेत. इमारत मोठी व प्रशस्त आहे पण दुरुस्ती आणि रंगरंगोटीची अत्यंत गरज आहे.या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने असलेल्या यंत्रणेचा पुरेसा वापर करणे व शेतकरी वर्गाला त्याचा फायदा मिळत नाही हे वास्तव आहे.या चिकित्सालयाच्या अंतर्गत प्रामुख्याने उरुळी कांचन,टिळेकरवाडी, शिंदवणे, खामगांव टेक, प्रयागधाम, कोरेगांव मूळ ही गांवे येतात, दवाखान्यामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे व आपत्कालीन काळात फिरत्या मोबाईल दवाखान्याचा वापर केला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com