

Woman Robbed of Gold Chain at Jejuri–Uruli Kanchan Road
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : महिलेला लिफ्ट देण्याचा बहाणा करून चारचाकी गाडीतून आलेल्या तिघांनी महिलेच्या गळ्यातील ८० हजाराचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना जेजुरी-उरुळी कांचन रोडवरील शिंदवणे (ता. हवेली)हद्दीतील कामठे बस स्टॉप ते काळे शिवार परिसर दरम्यान गुरुवारी (ता.२०) सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळात घडली. याप्रकरणी निर्मला दिलीप शिर्के (वय-५५, रा.कामठे मळा,शिंदवणे,ता. हवेली)यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी अज्ञात तीन जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.