Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Accident News: भरधाव टेम्पोने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना जोरात धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
accident
accidentsakal
Updated on

उरुळी कांचन : भरधाव टेम्पोने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना जोरात धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन गावाच्या हद्दीतील तळवाडी चौक बस थांब्यावर बुधवारी (ता. २) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. महबूब रहमान मियाडे (वय ६३, रा. सहजपूर, माकरवस्ती,ता. दौंड, जि. पुणे), अशोक भीमराव (वय २५,रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com