

अमेरिका, इस्राएल आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाची धग आता संयुक्त अरब अमिरातीतील दुबई पर्यंत पोहचली आहे. इराणने दुबईसह काही देशांत ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे आखाती देशातील बहुतांश सर्वच विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. पुण्यातून आज आणि उद्या दुबईला जाणारे विमाने सुद्धा रद्द करण्यात आली आहेत.